‘‘ राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमुळे विद्यार्थांचा सर्वांगीण विकास शक्य ’’
मविप्र सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांचे प्रतिपादन
कर्मवीर गणपत दादा मोरे निफाड महाविद्यालयात राज्यशास्त्र लोकप्रशासन अभ्यासक्रम विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न
निफाड प्रतिनिधी दि २७
‘‘ पारंपारिक शैक्षणिक धोरण हे कालबाहय होत असताना, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शैक्षणिक क्षेत्रात परीवर्तन करीत आहे.
साहित्य , कला, संस्कृती, ज्ञान इत्यादी बरोबर रोजागरांच्या संधी निर्माण करणारे शैक्षणिक धोरण असल्यामुळे त्याचा स्वीकार करीत होणारे बदल अध्यापकांनी स्वीकारावेत . नवीन शैक्षणिक धोरणामुळे राज्यशास्त्र,इतिहास अर्थशास्त्र हे विषय सैद्धांतिक बरोबर प्रत्यक्ष प्रॅक्टिकल स्वरूपात विद्यार्थ्यांना शिकता येणार त्या दृष्टीने अभ्यासक्रम तयार करणे सुरू आहे असे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
कर्मवीर गणपत दादा मोरे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय निफाड येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने द्वितीय वर्ष पदवी राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यासक्रम मार्गदर्शन कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी ते बोलत यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. राजधर टेमकर (अध्यक्ष राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळ) प्रमुख अतिथी अभ्यास मंडळ सदस्य डॉ .दत्तात्रय वाबळे , मविप्र शिक्षणाधिकारी डॉ नितिन जाधव, डॉ.संजय मराठे, डॉ .प्रशांत देशपांडे प्रा डॉ दत्तात्रय शेंडे,प्राचार्य डॉ ज्ञानोबा ढगे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजन करीत आणि विद्यापीठ गीत गायनाने सुरूवात करण्यात आली.
कार्यशाळेच्या प्रास्ताविकेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . ज्ञानोबा ढगे म्हणाले,‘‘ राज्यशास्त्र हा विषय व्यापक प्रमाणात असून तो इतर विषयाशी संबंधित आहे. राज्यशास्त्राच्या विद्याशाखा काळाच्या ओघात सर्वत्र वाढत आहे. त्यामुळे राज्यशास्त्र अभ्यास मंडळ अभ्यासक्रम निर्मिती करीत असताना विविध विषयांशी स्पर्श करीत आहे. भारतीय तत्ववेत्ते, धर्मसुधारक आणि साधुसंतांचे विचार समाजामध्ये रूजविण्याची गरज आहे.त्यासाठी अभ्यासक्रमात असे विषय निर्माण करणे आवश्यक आहे.”
प्रा डॉ.नितिन जाधव म्हणाले, ‘‘ आजचा काळ स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक आहे. अशा स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक काळात विद्यार्थांना सक्षम करणे आवश्यक आहे. विद्यार्थाच्या सक्षमीकरणासाठी पूरक आणि व्यावसायिक शिक्षण निर्माण होणे गरजेचे आहे. रोजगार निर्माण व्हावेत,त्यांचे उदरनिर्वाह उत्तम व्हावा. त्यानुषंगाने कौशल्यावर आधारित शिक्षण असावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थी हित साध्य करता येईल. यासाठी प्रत्येक प्राध्यापक, शैक्षणिक संस्था आणि अभ्यासमंडळ यांनी कार्यरत रहावे. ’’ असे मत व्यक्त केले
अभ्यास मंडळ अध्यक्ष प्राचार्य डॉ.राजधर टेमकर म्हणाले,‘‘ अभ्यासक्रम कार्यशाळेच्या माध्यमातून अध्यापन प्रक्रिया, अभ्यासक्रम रचना आणि अंमलबजावणी यासाठीचे मार्गदर्शन होत असताना, अध्यापक ज्ञानवंत होत असतो. त्यांच्या शंका व अडचणी दूर करण्याची संधी निर्माण होत असते. अध्यापन निर्मितीसाठी सर्व सहकार्यांची साथ मिळावी लागते. कार्यशाळेच्या माध्यमातून अध्यापन नवीन संकल्पना, रोजगार निर्मिती शिक्षण आणि संस्कार व ज्ञान विध्यर्थापर्यंत पोहचविण्याची संधी निर्माण होत असते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्याक्रम अंमलबजावणीसाठी सर्वांनी सहकार्य करण्याबरोबरच प्रत्येकाची नियोजन बद्धता असावी’’
डॉ. दत्तात्रय वाबळे म्हणाले ” राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होण्यावर अभ्यासक्रम समितीने भर दिलेला आहे. राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषय शिकवताना कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागेल , या सर्व अडचणी दूर करण्यासाठी प्राध्यापकांनी आपल्या ज्ञानाच्या आणि तंञज्ञानाच्या दिशा व्यापक कराव्यात .अभ्यासक्रमातील बदल हा निश्चितपणे विद्यार्थ्यांना लाभदायी आणि रोजगार संधी उपलब्ध करून देणाऱ्या आहेत .” असा विश्वास व्यक्त केला .
अभ्यासक्रम रचना आणि महत्त्व या विषयी मार्गदर्शन करतांना डॉ. प्रशांत देशपांडे म्हणाले ‘ ” राज्यशास्ञ आणि लोकप्रशासन विषयाचा अभ्यासक्रम निर्माण करीत असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची उद्दिष्टे विचारात घेण्यात आलेली आहेत .या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना दिशा मिळावी.कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीस प्राधान्य दिलेले आहे .त्यामुळे प्राध्यापकांनी विद्यार्थी हित विचारात घेत अभ्यासक्रम अनुषंगाने मार्गदर्शन करावे.
प्रा. डॉ. संजय मराठे म्हणाले.” राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयातील विद्यार्थी निपुण होण्यासाठी अभ्यासक्रम समितीने सर्वसामान्य विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली आहे.त्यामुळे मेजर आणि मायनर या विषयावर मार्गदर्शन करताना प्रात्यक्षिके देखील महत्त्वाची आहे .प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी बरोबर कौशल्य विकसित करीत आहेत .”
कार्यशाळा प्रसंगी अभ्यासक्रम अनुषंगाने विचारलेल्या विविध प्रश्नांची अभ्यासक्रम रचना समितीने समाधानकारक उत्तरे दिली.
या कार्यक्रम प्रसंगी अभ्यासक्रम रचना सदस्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यशास्त्र विषयात पीएच.डी पदवी संपादन करणारे प्रा.डॉ .शिवाजी गांगुर्डे व डॉ .सचिन लोखंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच अभ्यासक्रम आधारीत पाठयपुस्तके लिहिणारे डॉ .प्रमोद तांबे यांचाही या प्रसंगी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अभ्यासक्रम उपसमितीचे सदस्य डॉक्टर गणेश लिंबोळे, डॉ. गणेश गिरी डॉ. प्रभाकर जगताप प्रा. पिराजी गोणारकर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डी.के.मोगल यांनी केले तर आभार प्रा.प्रविण शार्दुल यांनी मानले.