निफाड महाविद्यालयात द्वितीय वर्ष राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यासक्रम एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
निफाड दि 23 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राज्यशास्त्र व लोकप्रशासन अभ्यास मंडळ आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय निफाड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाचे व्दितीय वर्ष कला या वर्गाचे बदलता अभ्यासक्रम संदर्भात कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक 26 जूलै 2025 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार बदलेले अभ्यासक्रम, स्वरूप आणि अंमलबजावणी या सदंर्भात विचारविनिमय होणार आहे. या कार्यशाळा प्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून ॲड.नितीन ठाकरे सरचिटणीस मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक,मा. श्री बाळासाहेब क्षीरसागर सभापती मराठा विद्या प्रसारक समाज संस्था नाशिक, प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, अध्यक्ष, राज्यशास्त्र लोकप्रशासन अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, डॉ.दत्तात्रय वाबळे ,मविप्र समाज शिक्षणधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. प्रशांत देशपांडे, प्रा डॉ विवेक घोटाळे यांच्यासह अभ्यास मंडळ सदस्य हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयाचे प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यशाळेसाठी जास्तीत जास्त प्राध्यापकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे आणि कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डी.के.मोगल यांनी केले आहे.